टोक्यो – कोरियाने भारताचे उपांत्य फेरीपर्यंत पोहोचण्याचे स्वप्न भंग केले आहे. क्वार्टर फायनलमध्ये अतानू दास, तरुणदीप राय आणि प्रवीण जाधव यांचा कोरियाने सरळ सेटमध्ये ६-० असा पराभव केला.
बॅडमिंटन
सात्विकसाई रेंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही भारतीय जोडी ऑलिम्पिकमधून बाहेर पडली आहे. त्यांच्यासमोर इंडोनेशियाच्या मार्कस आणि केविन यांचे तगडे आव्हान होते.
टेबल टेनिस
सुर्तिथा मुखर्जी टोक्यो ऑलिम्पिकमधून बाहेर पडली आहे. पोर्तुगीज खेळाडूने तिला सरळ गेममध्ये ३-११, ३-११, ५-११, ५-११ असे पराभूत केले.
भवानी देवी ऑलिम्पिकमधून बाहेर
भवानी देवीचा ऑलिम्पिकमधील प्रवास संपला आहे. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या फ्रान्सच्या मॅनॉन ब्रुनेटविरोधातील सामन्यात भवानी देवीचा पराभव झाला आहे. ७-१५ ने भवानी देवीचा पराभव झाला असून ऑलिम्पिकमधील तिच्या प्रवासाला पूर्णविराम लागला आहे.
तमिळनाडूच्या सीए भवानी देवीने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीत भारताचे प्रतिनिधित्व करताना इतिहास रचला आहे. तलवारबाजीत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या एकमेव खेळाडूने एकेरी महिला गटात विजयी सुरुवात केली आहे. भवानी देवीने ट्युनिशियाच्या नादिया बेन अजिजीचा १५-३ ने पराभव केला.
भवानी देवीने फक्त सहा मिनिटे १४ सेकंदांमध्ये सामना जिंकत प्रथमच ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीत यश मिळवून दिले आहे. तलवारबाजी या खेळात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली ती भारताची पहिली खेळाडू ठरली होती.