‘कोल्ड, लस्सी और चिकन मसाला’साठी दिव्यांकाचा त्याग

“कोल्ड लस्सी और चिकन मसाला’ या वेबसिरीजमधून दिव्यांका त्रिपाठी लवकरच डिजीटल प्लॅटफॉर्मवर पदार्पंण करणार आहे. तिच्याबरोबर राजीव खंडेलवाल असणार आहे आणि हे दोघेही शेफच्या रोलमध्ये असणार आहेत. हा रोल करण्यासाठी आपल्याला होमवर्क करायला लागणार आहे, हे दिव्यांकाने आगोदरच ओळखले होते.

आपला लुक बदलण्यासाठी तिने आपल्या लांबसडक केसांचा त्याग करण्याचे ठरवले. तिच्या रोलसाठी छोटे केसच योग्य असल्याचे लक्षात आल्यावर तिने राजीखुशीने केसांना कात्री लावली. खरे तर लांब केस ही दिव्यांकाची ओळख होती. केस कापल्यावर तिला काही तरी चुकल्यासारखे वाटायला लागले होते. मात्र खांद्यापर्यंतच्या स्टेपकटला सगळ्यांकडून कौतुक मिळायला लागल्यावर तिला आपला निर्णय योग्यच होता, हे लक्षात आले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×