मुंबई – इराणमध्ये सध्या हिजाब प्रकरणावरून मोठा वाद सुरु आहे. हिजाब प्रकरणावरून इराणमध्ये मोठी चळवळ उभी राहत असताना आता अनेक कलाकारांनी देखील याबाबत भाष्य करायला सुरुवात केली आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्राने देखील काही दिवसांपूर्वी याबाबत एक पोस्ट केली होती. मात्र आता सेक्रेड गेम या वेब सिरींजमधील एका अभिनेत्रीने थेट आपले कपडे स्ट्रीप करत या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे.
नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉरवर प्रदर्शित झालेली सेक्रेड गेम ही सिरीज चांगलीच गाजली होती. गणेश गायतोंडे,कुक्कु,जो जो,त्रिवेदी अशी अनेक पात्रे आजही सर्वांच्या लक्षात आहे. एलनाझ नोरुझी या परदेशी अभिनेत्रीने देखील या सिरीजमध्ये अभिनय केला होता. मूळची इराणमधील असलेली ही अभिनेत्री आता पुन्हा चर्चेत आली आहे. इराणमध्ये सुरु असलेल्या हिजाब प्रकारावरून अभिनेत्रीने आपला निषेध नोंदवला आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री कॅमेऱ्यासमोर आपले कपडे काढताना दिसते तसेच बॅग्राऊंडला इराणी संगीत देखील सुरु असल्याचे पाहायला मिळते.
View this post on Instagram
“माय बॉडी माय चॉईस” अशा आशयाखाली अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्हिडीओसह एक पोस्ट शेअर केली आहे. मी न्यूड पणाला प्रोत्साहन देत नसून निवड स्वातंत्र्याचा प्रचार करत असल्याचे अभिनेत्री म्हणते. इराणमधील एका तरुणीला हिजाब नीट न परिधान केल्यामुळे मारहाण झाली होती त्यात तिला आपले प्राण गमवावे लागले त्यानंतर जगभरातून हिजाब विरोधात आवाज उठवायला सुरुवात झाल्याचे दिसून आले.