सॅक्रेड गेम्सच्या कलाकारांना मिळतेय सर्वाधिक पसंती

सॅक्रेड गेम्सचा दूसरा सिझन चांगलाच लोकप्रिय झाला. ह्या वेबसीरिजच्या भूमिका आणि त्यांचे संवादसुध्दा लोकांच्या पसंतीस पडले. काही संवाद तर प्रेक्षकांना मुखोद्गतच झाले. सरताज सिंग आणि गणेश गायतोंडे ह्या दोन भूमिकांसोबतच सॅक्रेड गेम्सच्या पहिल्या आणि दुस-या पर्वातल्या इतरही भूमिकांना आणि त्या निभावणा-या कलाकारांना चांगलीच प्रसिध्दी मिळाली.

अमेरिका स्थित मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेंड्स इंडियाने सॅक्रेड गेम्सच्या अभिनेत्यांच्या लोकप्रियतेची एक लिस्ट नुकतीच काढली आहे. त्यानुसार, सरताजच्या भूमिकेत दिसलेल्या सैफ अली खानच्या लोकप्रियतेत सॅक्रेड गेम्सचे दूसरे पर्व रिलीज झाल्यानंतरच्या आठवड्यात (15 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट) 78 गुणांवरून 100 गुणांपर्यंत वाढ झालेली दिसून आली. ज्यामुळे सैफ अली खान लोकप्रियतेत प्रथम क्रमांकावर आहे. गणेश गायतोंडे बनलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीचीही लोकप्रियता 55 गुणांवरून 59 गुणांपर्यंत पोहोचलीय. ज्यामुळे नवाज लोकप्रियतेत दूस-या क्रमांकावर पोहोचला.

बात्या एबेलमॅन बनलेली कल्कि कोचलिन लोकप्रियतेत तिस-या स्थानावर आहे. सुरूवातीला 39 गुणांवर असलेली कल्कि लोकप्रियतेत 47 गुणांवर पोहोचली आहे. पूर्व आयएसआय प्रमुख शाहिद खानच्या खतरनाक भूमिकेत अभिनेता रणवीर शौरी होता. त्याच्या ह्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाल्याने तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

सीझन 2 मधल्या सर्वाधिक लोकप्रिय गुरुजींच्या भूमिकेत दिसलेला प्रतिभावान अभिनेता पंकज त्रिपाठी पाचव्या स्थानावर आहे. तर पहिल्या पर्वात दिसलेली अभिनेत्री राधिका आपटे सहाव्या स्थानावर आहे. पहिल्या सिझननंतर दूस-या पर्वातही राधिका असेल का, ह्याविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. त्यामूळेच सॅक्रेड गेम्स रिलीज होण्याच्या आठवड्यात आणि त्या आठवड्यानंतर राधिकाच्या लोकप्रियतेत वाढ झालेली दिसून आलीय.

सुरवीन चावला उर्फ जोजो, अमृता सुभाष उर्फ  केडी यादव मॅडम, एलनाज़ नौरोज़ी उर्फ जोया मिर्ज़ा आणि ल्यूक केनी उर्फ मलकोम ह्या कलाकारांनांही सॅक्रेड गेम्सच्या रिलीजनंतर चांगलीच प्रसिध्दी मिळाली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)