सचिन पुन्हा मैदानात उतरणार

रोड सेफ्टी स्पर्धा 2 मार्चपासून

मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज बनला आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज ही स्पर्धा सचिनच्या पुढाकाराने यंदा 2 ते 21 मार्च या कालावधीत खेळवण्यात येणार आहे.

या स्पर्धेत सचिनबरोबर भारताचा धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागही खेळणार आहे. तसेच ब्रायन लारा, ब्रेट ली, तिलकरत्ने दिलशानसारखे महान खेळाडूही यावेळी आपल्याला खेळताना दिसणार आहेत. छत्तीसगढ येथील शहीद वीर नारायण सिंग आंतराराष्ट्रीय स्टेडियममध्ये हे सामने खेळवण्यात येणार आहेत.

रस्त्यावर बऱ्याच दुर्घटना होत असतात. त्याचबरोबर काही जणांना नियमही माहिती नसतात. या नियमांबाबत लोकांना जागृत करण्यासाठी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचे आयोजन करण्यात येते. गेल्याच वर्षीच रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजची सुरुवात झाली होती.

पण करोनामुळे या सीरीजचे काही सामने रद्द करण्यात आले होते. आतापर्यंत रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचे चारच सामने खेळवले गेले आहेत. या स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.