सचिन वाझेंचे खळबळजनक आरोप;”एनआयए कोठडीत माझा छळ केला, अपमानित करत जबरदस्तीने…”

मुंबई :  मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक ठेवल्या प्रकरणात निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची माजी न्यायामूर्ती चांदीवाल यांच्यासमोर सुनावणी  झाली. यावेळी झालेल्या सुनावणीत वाझे यांनी तपास यंत्रणेवर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या  कोठडीत असताना आपला छळ करण्यात आला असल्याचे म्हटले. तसेच  अपमानित करत जबरदस्तीने कागदपत्रांवर स्वाक्षरी घेण्यात आली असा खळबळजनक आरोप केला आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने मार्च महिन्यात चांदीवाल आयोग गठीत केला होता. मंगळवारी अनिल देशमुखांच्या वकिलांनी उलटत पासणी केली असता सचिन वाझेंनी आपण एनआयए विशेष कोर्टाकडे स्वाक्षरी केलेल्या कागदपत्रांची मागणी केली असून, अद्याप ती मिळाली नसल्याची माहिती दिली.

अनिल देशमुखांच्या वकील अनिता यांनी तुम्ही एनआयए कोठडीत असताना तुम्ही कोणत्या दबावात होतात का? असे विचारण्यात आले असता सचिन वाझे यांनी म्हटले की, “हो नक्कीच….ते माझ्या आयुष्यातील सर्वात जास्त मानसिक त्रास देणारे दिवस होते”. पुढे त्यांनी विचारल की, “त्या काळात अनेक केंद्रीय तपास यंत्रणा तुमचा जबाब नोंदवत होत्या?”. यावर उत्तर देताना सचिन वाझेंनी सांगितलं की, “याचं योग्य उत्तर असं आहे की, त्या २८ दिवसांमध्ये एनआय छळ, अपमान आणि मानसिक त्रासासाठी कारणीभूत ठरत होतं”.

“मी एनआयए कोठडीत होतो तेव्हा मला जबरदस्तीने काही कागदपत्रांवर सह्या करण्यास भाग पाडण्यात आलं. ही कागदपत्रं मला देण्यात आलेली नाहीत. ३ मे रोजी मी विशेष एनआयए कोर्टाकडे ही कागदपत्रं दिली जावीत अशी विनंतीही केली होती,” असे सचिन वाझे यांनी सांगितले. बुधवारी याप्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.