नवी दिल्ली : डिसेंबर २०१५ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या ‘आॅल इंडिया कौन्सिल आॅफ स्पोर्टस’ (एआयसीएस) नामक समितीमधून माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि पाच वेळचा ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंद या दोघांना वगळण्यात आले आहे. समितीच्या बैठकांना दोघांना फारसा वेळ देता येत नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
सचिन आणि आनंद यांच्या ऐवजी ‘आॅल इंडिया कौन्सिल आॅफ स्पोर्टस’ समितीवर कुस्तीपटू योगेश्वर दत्त आणि पॅरालिंपियन दीपा मलिक यांना नियुक्त करण्यात आले आहे.
Great to learn about being inducted into the All India Council of Sports. Extend my gratitude for giving me an opportunity to serve my nation, contribute to the growth of #ParaSports and give back effectively 2 the fraternity of sports which has given me everything! @IndiaSports pic.twitter.com/kB1N00zgRZ
— Deepa Malik PLY (@DeepaAthlete) January 22, 2020
दरम्यान, एआयसीएस ही क्रीडा मंत्रालयाला सल्ला देणारी संस्था असून २०१५ मध्ये तत्कालीन क्रीडा मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी याची स्थापना केली होती. डिसेंबर २०१५ ते २०१९ असा या समितीचा पहिला कार्यकाळ होता.