नवी दिल्ली : तुझी फलंदाजी पाहताना खूप आनंद होतो.अशीच खेळत राहा आणि संघाच्या विजयात हातभार लाभ, अशा शब्दात भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज शफाली वर्मा हिचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कौतुक केले आहे.
प्रत्यक्ष क्रिकेटच्या देवानेच पाठ थोपटल्याने भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाही आणि सचिन सरांच्या शाबासकीमुळे आता सरस कामगिरी करण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे आणि त्यांचा विश्वास निश्चितच सार्थ ठरवीन, अशी प्रतिक्रिया शफालीने व्यक्त केली.
Thank you sir for your kind words and support! I'll keep giving my best for the team sir 🇮🇳🙂 @sachin_rt https://t.co/eFjs352l27
— Shafali Verma (@TheShafaliVerma) February 28, 2020
शफालीने महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आतापर्यत झालेल्या साखळी फेरीतील चारही सामन्यात कमालीचे सातत्य दाखविले आहे. तिने पहिल्या ते चौथ्या सामन्यात अनुक्रमे आॅस्ट्रेलियाविरूध्द २९(१५), बांगलादेशविरूध्द ३९(१७), न्यूझीलंडविरूध्द ४६(३४) आणि श्रीलंकेविरूध्द ४७(३४) धांवाची खेळी केली आहे. तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच भारतीय संघाने दिमाखात स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे.
क्रिकेटच्या या देवाकडूनच प्रेरणा घेत क्रिकेट खेळायला सुरूवात केली व सचिन सरांकडूनच मला शबासकी मिळाल्याचा सर्वात जास्त आनंद होत आहे, असे शफालीने सांगितले आहे.