मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने कोरोनापासून बाधा होऊ नये यासाठी प्रत्येकाने योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे केले आहे. आपण सगळे करोना विषाणूबाबत भयभीत झालो आहोत. आपले आरोग्य जपा तसेच योग्य ती दक्षता घ्या, अत्यंत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, असेही सचिनने या आवाहनात नमूद केले आहे.
एक नागरिक के तौर पर हमारी कुछ जिम्मेदारियां हैं।
हम कुछ आसान से कदमों का पालन कर कोरोना वायरस (COVID-19) को दूर रख सकते हैं। मैं आपसे अनुरोध करता हूँ कि बुनियादी बातों का ख्याल रखें ताकि हम सभी सुरक्षित रहें। #IndiaFightsCorona@MoHFW_INDIA pic.twitter.com/vBYnEbYZ4C— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 18, 2020
दरम्यान, राज्यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 52 झाली आहे, तर देशात 200 हून अधिक रुग्ण आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सरकारकडून राबवण्यात येत आहेत. तसेच राज्यसरकारबरोबरच सेलिब्रिटी, खेळाडू हे देखील सोशल मीडियाव्दारे कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करीत आहेत.