सचिन तेंडुलकर पडला ‘सुलतान ऑफ स्विंग’च्या प्रेमात

File photo

नवी दिल्ली : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर निवृत्त होऊन 5 वर्षांपेक्षा अधिकच कालावधी झाला, तरी देखील चाहत्यांचे सचिनवरील प्रेम किंचितही कमी झाले नाही. पण लाखोंच्या गळ्यातला ताईत असलेला सचिन मात्र सुलतान ऑफ स्विंगच्या प्रेमात पडल्याचे दिसत आहे.

सचिनने गुरुवारी एका इंग्लिश म्युझिकल सुपरस्टार मार्क नॉफ्लरची भेट घेतली आणि त्याच्या सोबत एक फोटो काढून तो फोटो ट्विटरवर पोस्ट केला. या फोटोसहित त्याने एक कॅप्शनदेखील पोस्ट केली. त्याने लिहिले की मार्क नॉफ्लरची भेट घेणं हे कायमच सुखावह असतं. त्याच्यासोबत नाश्‍ता करताना संगीत, खेळ आणि जीवनाबाबतच्या गप्पा मारताना मजा आली. मार्क नॉफ्लर हा उत्तम संगीतकार, व्यक्ती आणि सुलतान ऑफ स्विंग आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)