#व्हिडिओ : सचिन तेंडुलकरने बजावला हक्क, मतदान करण्याचे केले आवाहन

मुंबई – आज महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडत आहे. सामान्य नागरिकांसोबतच, अनेक कलाकारांनी, राजकीय नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने मुंबईतल्या वांद्रेमध्ये सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे.

यावेळी त्याची पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुन तेंडुलकर यांच्यासह मतदान केले. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्याने इतर मतदारांनाही मतदान करण्याचे आवाहन केले. “मतदान करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. मी माझ मत नोंदवल आहे, आपण सर्व सुद्धा मतदान करून या लोकशाहीच्या सोहळ्याचा भाग व्हा”, असे ट्विट करत मोलाचा संदेश दिला त्याने दिला आहे.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.