मुंबई – सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व जग हादरले आहे. सेलिब्रिटी वर्ल्डही आपापल्या परीने सोशल मीडियावरून जनजागृतीचे मेसेज आणि व्हिडीओ पोस्ट करत आहेत. त्याच दरम्यान, मास्टर ब्लास्टर ‘सचिन तेंडुलकर’ने हात धुतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडिओत सचिन म्हणतो कि, “हात फक्त पाण्याने न धुता साबणाचा वापर करायला हवा, याशिवाय किमान 20 सेकंद हात स्वच्छ धुवायला हवा आणि कोरड्या टॉवेलने स्वच्छ करणं गरजेचं आहे”. असं सचिनने सांगितलं आहे.
देशभरात कोरोनाचा फैलाव वाढत असताना नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यायला हवं. याबाबत राज्य सरकारकडून वेळोवेळी नियमावली जाहीर केली जात आहे. यामध्ये जनतेला स्वच्छतेचं महत्त्व व कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक बाबींचं पालन करण्याचं आवाहन विविध पद्धतीनं करीत आहेत.