सचिन घरी परतला; विलगीकरण सक्‍तीचे

मुंबई – करोनाची बाधा झाल्यामुळे एका खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. मात्र, पुढील किमान सात दिवस त्याला घरातच विलगीकरणात राहावे लागणार आहे.

गेल्या महिन्यात रोड सेफ्टी क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या सचिनला करोनाची बाधा झाल्याचे 27 मार्चला समोर आले होते. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मी घरी परतलो आहे. तरीही पुढील काही दिवस विलगीकरणातच राहणार आहे. मला जास्तीत जास्त विश्रांती घ्यावी लागणार आहे.

माझ्यासाठी शुभेच्छा आणि प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांचा मी आभारी आहे. रुग्णालयातील कर्मचारी वर्गाचे तसेच चाहत्यांचा मी ऋणी आहे, असे ट्‌विट सचिनने केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.