सचिन पिळगावकर यांची सन्मानचिन्ह नोकराने विकली भंगारात

मुंबई- मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते,गायक आणि दिग्दर्शक ‘सचिन पिळगावकर’ यांना नोकराने फसवल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे सचिन यांचा अमृत सोळंकी (वय 35) हा अतिशय विश्वासू असा नोकर होता. सचिन यांच्या जुहू येथील कार्यालयात ठेवण्यात आलेले सन्मानचिन्हे या नोकराने गायब केले आहेत. सचिन आणि त्यांचे वडिल शरद पिळगावकर यांना मिळालेली ही सर्व सन्मानचिन्ह होती.

गेल्या काही दिवसांपूर्वी जुहू येथील सचिन यांच्या कार्यालयाचे डागडुजीचे काम सुरु केले होते. आणि याच ठिकाणी हे सर्व सन्मानचिन्हे जतन करुन ठेवली होती. दरम्यान, हे काम पाहण्यासाठी सचिन आणि त्यांची पत्नी अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर कार्यालयात पोहचल्या होत्या. मात्र त्यांना तेथे सन्मानचिन्हे दिसली नाहीत. त्यांनी याबाबत त्यांचा नोकर अमृत सोळंकी याला विचारले. ज्याला उत्तर देताना सोळंकी याने कार्यालयाचे काम सुरु असताना सन्मानचिन्हे धुळीने खराब होऊ नये म्हणून गोणीत भरुन ठेवली असल्याचे सांगितले. मात्र सध्या ती कुठे गेली हे माहित नसल्याचे सोळंकीने सांगितले.

त्यानंतर सुप्रिया यांनी घडलेला प्रकार सचिन यांच्या कानावर घातला. सचिन यांनी त्वरीत सांताक्रूझ पोलिस ठाण्यात सर्व प्रकारची तक्रार दाखल केली. सचिन आणि सुप्रिया यांचा नोकर अमृतवर संशय असल्यामुळे पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतेले. अमृतने ही सन्मानचिन्हे केवळ 400 ते 500 रुपयांना विकली असल्याची कबुली दिली. वडिलांनी इतके वर्षे मेहनत घेऊन कमावलेली सन्माचिन्ह कवडीमोल पैशासाठी विकली गेल्यामुळे सचिन यांना मोठा धक्का बसला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.