सचिनने जागविल्या सर डॉन ब्रॅडमन यांच्या आठवणी !!!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सार्वकालीन महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्या जन्मदिवशी त्यांच्या आठवणी जाग्या केल्या. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना सचिन आणि शेन वॉर्न यांना सर डॉन ब्रॅडमन यांनी जेवणाचे निमंत्रण दिले होते.  त्यानंतर  सचिनने सर डॉन ब्रॅडमन यांची भेट  घेतली.

सचिनने आपल्या ट्विटर  अधिकृत ट्विटर खात्यावरून ट्विट केले आणि त्यात असे लिहले की, त्यांना भेटून मला जवळजवळ  २० वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु ती भेट आजही माझ्या स्मरणात जशीच्यातशी स्पष्ट आहे. त्यांचा उबदार प्रेमळपणा आजही मला आठवतो आहे. आज मी त्यांना त्याच प्रेमापोटी खूप आठवत आहे. कारण त्यांची आज ११०वी जयंती आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सर डॉन  ब्रॅडमन यांच्या  कारकिर्दीच्या आकडेवारीवर जरी नजर टाकली तरी त्यांचे श्रेष्ठत्व सहज लक्षात येईल. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५२ कसोटी सामन्यात ८० डावात फलंदाजी करताना ९९.९४ च्या सरासरीने ६,९९६ धावा केल्या आहेत. आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या कसोटीमध्ये त्यांना आपली सरासरी १०० करण्यासाठी फक्त ४ धावांची गरज होती परंतु ते शून्यावर बाद झाले. घरेलू क्रिकेटमध्ये त्यांनी ९५. १४च्या सरासरीने २८,०६७ धाव काढल्या. त्यात त्यांची सर्वोच्च धावसंख्या  ४५२ नाबाद होती. या सार्वकालीन महान फलंदाजाचा मृत्यू २५ फेब्रुवारी २००१ला झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)