मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर केवळ क्रिकेटमध्येच नव्हे तर कॅरम खेळातही मास्टर असल्याचे दाखवून दिले. सचिनने त्याचा मुलगा अर्जुनला कॅरम खेळताना लिलया पराभूत केले. या दोघांमध्ये खेळवण्यात आलेला सामना सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
रानी तो पप्पा नी! 😋💙#OneFamily #MumbaiIndians #IPL2021 #SachinTendulkar #KhelTakaTak @sachin_rt @MXTakaTak MI TV pic.twitter.com/dWo0cN2FSX
— Mumbai Indians (@mipaltan) October 10, 2021
यावेळी अर्जुनसह मुंबईचा यष्टीरक्षक आदित्य तरेही खेळत होता. कॅरमच्या या सामन्यात सचिननेच बाजी मारली. सचिनने क्वीन घेतली.
त्यावेळी कव्हर कसे घेणार या अर्जुनने विचारलेल्या प्रश्नावर सचिनने डोळे मिचकावले व थाटात कव्हरही घेत सामना जिंकला. हा सामना खेळताना अर्जुन सतत सचिनला डिवचत होता.
मात्र, समोरच्या गोलंदाजाने सातत्याने त्रस्त केल्यावरही सचिन आपले लक्ष्य विसरत नाही हेच पुन्हा एकदा दाखवून दिले व सामना जिंकला.