फुरसुंगी : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सचिन हांडे मित्र परीवाराच्यावतीने हांडेवाडी परीसरातील गरजू नागरीकांना एक मदतीचा हात म्हणून जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले. यावेळी हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंभार ,सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय गाडे, नगरसेवक मारुती तुपे ,हवेली भाजपा अध्यक्ष धनंजय कामठे ,ग्रामसेवक प्रगती कोरडे ,सोमनाथ हांडे, शरद हांडे,गणेश हांडे ,समाधान हांडे ,स्वप्नील हांडे ,महेश भाडळे, आयोजक सचिन भाऊ हांडे हवेली अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सचिन हांडे म्हणाले की, तुम्ही घराबाहेर गेले तरच कोरोना तुमच्या घरात येणार आहे. त्यामुळे पुढील तुम्ही काही दिवस घरातच रहा, सुरक्षित रहा, शासनाला सहकार्य करत प्रशासनाच्या सुचनांचे पालन करा, हा सर्वात चांगला उपाय आहे. आम्ही तुम्हाला काहीही कमी पडु देणार नाही असे हांडे म्हणाले.
यावेळी पोलीस निरीक्षक कुंभार म्हणाले,कि विविध सामाजिक संस्थां, मंडळ,कार्यकर्त्यांनी आपल्या भागात असलेल्या गोरगरीब, गरजू, मोलमजुरी करून हातावर पोट भरणारऱ्या लोकांना आपल्या पध्दतीने अन्नधान्याची मदत करावी. तसेच भाजपचे युवामोर्चा हवेली तालुका अध्यक्ष सचिन हांडे गेल्या काही दिवसांपासुन राबवत असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत. त्यांच्याप्रमाणे इतरांनीही मदत केली तर कोणी उपाशी राहणार नाही असे ते म्हणाले.