Sachin Vaze : 100 कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी ‘सचिन वाझे’ला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात यापूर्वी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह इतर आरोपींना जामीन मिळाला आहे. त्याच आधारे वाझेने जामीन देण्याची विनंती केली होती.
अनिल देशमुखांनी दरमहा शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप सचिन वाझेने केला होता. त्या कथित आरोपांप्रकरणी आता उच्च न्यायालयाने वाझेला जामीन दिला आहे.
सचिन वाझे मार्च 2021 पासून तुरुंगात आहे. त्याने सुटकेसाठी अॅड. रौनक नाईक यांच्यामार्फत रिट याचिका केली होती. त्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या द्विसदसीय खंडपीठाने मंगळवारी निर्णय दिला.
#JustIn: Bombay High Court grants bail to controversial cop Sachin Vaze, who was booked in the corruption case related to former Maharashtra Home Minister and senior NCP (SP) leader Anil Deshmukh. #BombayHighCourt #SachimVaze #Maharashtra pic.twitter.com/NVBV71zDw6
— Live Law (@LiveLawIndia) October 22, 2024
नेमकं प्रकरण काय होत? वाचा…
2020 मध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराबाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याचा आणि धमकी दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यासोबतच मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि 100 कोटींच्या खंडणी प्रकरणातही त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते.
त्यानंतर या प्रकऱणात त्यांच्यार निलंबनाची कारवाईदेखील करण्यात आली. विशेष सीबीआय न्यायालयाने गेल्यावर्षीच सचिन वाझे यांना जामीन दिला होता. पण इतर दोन गुन्ह्यांतही ते आरोपी असल्याने गेल्यावर्षीपासून त्यांचा तुरुंगवास लांबला आहे.