राज्य सरकारने मनावर घेतले तरच आरक्षणाचा गुंता सुटेल

अकोला : मराठा समाजाचे प्रश्न हे एका तासात निकाली लागू शकतात. राज्य सरकारने मनावर घेतले तरच आरक्षणाचा गुंता सुटेल. पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे आहे. मात्र आम्हाला चर्चा किंवा वाद नको आहेत. त्यामुळे यावर पर्याय शोधा, असे वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले. संभाजीराजे हे संवाद दौऱ्यानिमित्त अकोल्यात आले असताना त्यांनी मराठा आरक्षणावरुन चांगलीच टीका केली.

मराठा आरक्षणावर सद्यस्थितीत समाजाची भूमिका काय? याबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती सध्या राज्याचा दौरा करत आहेत. काल ते मराठा समाज जनसंपर्क दौऱ्याच्या निमित्ताने अकोल्यात होते. यावेळी त्यांनी अकोल्यात एका छोटेखानी सभेत समाजाशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राज्य सरकारवर जोरदार घणाघात केला.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आधी समाज बोलला. लोकही बोललेत. समाजानं आपल्या हक्कांसाठी आंदोलनं आणि महामोर्चेही काढलेत. आता मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारनं हाती घ्यावा. त्यासाठी आता सरकारवर दबावासाठी समाजानं लोकप्रतिनिधी असलेल्या खासदार-आमदारांना जाब विचारावा. मराठा समाजाला या लोकप्रतिनिधींनी उत्तर द्यावं, असे वक्तव्य संभाजी महाराज यांनी अकोल्यात केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.