मुंबई – बीसीसीआयच्या क्रिकेट ऑपरेशन विभागाचे सरव्यवस्थापक व माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू साबा करीम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राहुल जोहरी यांच्यानंतर करीम हे बीसीसीआयच्या पदाचा राजीनामा देणारे दुसरे उच्च पदस्थ अधिकारी ठरले आहेत. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागणार हे स्पष्ट होते.
देशांतर्गत क्रिकेटचे व्यवस्थापन तसेच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे काम पाहणे आणि त्याचा आढावा घेणे व आवश्यक त्या सुविधा पुरविणे ही त्यांची जबाबदारी होती. नव्या व्यक्तीची नियुक्ती होईपर्यंत ते पदावर राहणार असल्याचे बीसीसीआयने सांगितले.