हिंदी मीडियम मधील इरफान खानची पाकिस्तानी हिरोइन सबा कमरने आपले लग्न मोडले आहे. तिच्या या निर्णयामागचे कारण स्पष्ट नाही. मात्र, तिचे लग्न ज्याच्याबरोबर ठरले होते त्याच्यावर सबा कमरने काही काळापूर्वी लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. अजिम खान असे तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव होते.
आपल्या आजपर्यंतच्या आयुष्यात अजिम खानला आपण कधीही भेटले नसल्याचे केवळ फोनवरून एकमेकांशी बोलल्याचे सबा कमरने म्हटले आहे. सबा कमरच्या पोस्टवर अजिम खानने कॉमेंट करून ही आपली चूक असल्याचे म्हटले आहे. त्याने सबाच्या चांगल्या स्वभावाचे कौतुकही केले आहे आणि तिला मनापासून शुभेच्छाही दिल्या आहेत. या लग्ग मोडण्यामागे लैंगिक अत्याचाराच्या आरोपाचे कारण असावे असा अंदाज आहे.