जोहान्सबर्ग : इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात सर्वबाद ४०० धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात १८३ वर गुंडाळत इंग्लंडने २१७ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर तिस-या दिवसअखेर इंग्लंडने दुस-या डावात सर्वबाद २४८ धावा करत दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ४६६ धावांचे आव्हान ठेवले आहे.
England are all out for 248! South Africa need 466 to win.#SAvENG https://t.co/ggKmmyLxuq
— ICC (@ICC) January 26, 2020
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना जक क्राॅल ६६, जो रूट ५९, आॅली पोप ५६, डोमिनिक सिबली ४४, स्टुअर्ट ब्राॅड ४३ आणि मार्क वूडच्या नाबाद ३५ धावांच्या खेळीच्या जोरावर पहिल्या डावात ९८.२ षटकांत सर्वबाद ४०० धावा केल्या. द.आफ्रिकेकडून गोलंदाजीत ऐनरीक नाॅर्टजेने सर्वाधिक ५, ब्यूरन हेड्रिक्संने १, वरनाॅन फिलेंडर आणि डेन पॅटरसन यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
त्यानंतर प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात सर्वबाद १८३ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या डावात क्विटंन डी काॅकने सर्वाधिक ७६ आणि ड्वेन प्रीटोरियसने ३७ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून गोलंदाजीत मार्क वूडने सर्वाधिक ५ तर क्रिस वोक्स आणि बेन स्टोक्सने प्रत्येकी २ गडी बाद केले.
त्यानंतर इंग्लंडने दुस-या डावात जो रूटच्या ५८, डोमनिक सिमलीच्या ४४ आणि सॅम करनच्या ३५ धावांच्या जोरावर सर्वबाद २४८ धावा करत पहिल्या डावातील २१७ धावांच्या आघाडीसह दक्षिण आफ्रिकेसमोर ४६६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दक्षिण आफ्रिकेकडून ब्यूरन हेंड्रिक्सने सर्वाधिक ५ तर ऐनरिक नाॅर्टजे आणि प्रीटोरियसने प्रत्येकी २ गडी बाद केले. जो रूटच्या रूपात इंग्लंडची शेवटची विकेट पडली.
रूट बाद होताच तिस-या दिवसांचा खेळ थांबविण्यात आला, आता दक्षिण आफ्रिकेला हा कसोटी सामना जिंकण्यासाठी व मालिकेत बरोबरी साधण्यासाठी ४६६ धावा कराव्या लागतील. दरम्यान, इंग्लंडने या चार कसोटी सामन्याच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.