Sa Re Ga Ma Pa 2024: ‘सा रे गा मा पा’ या रिॲलिटी शोला नवीन विजेता मिळाला आहे. यंदाच्या पर्वाची विजेती गायक श्रद्धा मिश्रा ठरली आहे. मागील 5 महिन्यापासून या रिॲलिटी शो ने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. सचेत-परंपरा, गुरु रंधवा, सचिन-जिगर हे या कार्यक्रमाचे परीक्षक होते. 5 महिने चाललेल्या या कार्यक्रमाचे ग्रँड फिनालेमध्ये श्रद्धाने बाजी मारली. श्रद्धाने तिच्या मंत्रमुग्ध आवाजाने प्रेक्षकव परीक्षकांचे मन जिंकत ट्रॉफीवर नाव कोरले आहे.
फिनालेमध्ये 6 स्पर्धक पोहोचले होते. सुभाश्री देबनाथ, उज्वल मोतीराम गजभर, बिदिशा हातिमुरिया, पार्वती मीनाक्षी आणि महर्षि सनत पंड्या या स्पर्धकांना मागे टाकत श्रद्धाने ट्रॉफी जिंकली आहे. सुभाषश्री देबनाथ व उज्ज्वल मोतीराम हे प्रथम व द्वितीय उपविजेते ठरले. श्रद्धाला ट्रॉफीसोबतच 10 लाख रुपये बक्षीस स्वरुपात देण्यात आले.
View this post on Instagram
फिनालेमध्ये स्पर्धकांनी शानदार परफॉर्मेंस करत सर्वांची मने जिंकली. फिनालेमध्ये उदित नारायण आणि कविता कृष्णमुर्ती यांनी देखील गाणे सादर केले. फिनालेला भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहने देखील हजेरी लावली होती.
ट्रॉफी जिंकल्यानंतर आनंद व्यक्त करत श्रद्धा म्हणाली की, ‘माझ्यासाठी हा स्वप्नपूर्तीचा अनुभव होता. माझा ‘सा रे गा मा पा’ चा प्रवास खूपच आश्चर्यकारक होता. इथे मी खूप काही शिकलो. परीक्षकांनी मला ज्या प्रकारे साथ दिली आणि मार्गदर्शन केले, हा अनुभव माझ्यासाठी खूपच चांगला होता. मी माझे करिअरही याच क्षेत्रात पाहते. माझा हा प्रवास सुंदर केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार.’
जिंकलेल्या बक्षिसाच्या रक्कमेचे काय करणार हे देखील तिने सांगितले. या रक्कमेतून स्वतःचा स्टुडिओ बांधणार असल्याचे व वडिलांच्या पायावर उपचार करणार असल्याचे श्रद्धाने सांगितले.