एस. एस. स्कूलची गगनभरारी…

गुणवत्तापूर्ण शिक्षण, माफक फी व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या त्रिसूत्रीच्या आधारे वाटचाल करणारी एस. एस. इंग्लिश मीडियम स्कूल नावारूपाला आली आहे. येरवडा, विश्रांतवाडी परिसरातील प्रगतीपथावर असणाऱ्या गुणवत्तापूर्ण स्कूलने शैक्षणिक क्षेत्रात एक वेगळी उंची प्राप्त केली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे गगनभरारी घेणारी ही शाळा सर्वोत्तम असल्याचे पालक म्हणतात.

आळंदी रस्त्यावरील मोहनवाडीमध्ये इंद्रायणी शिक्षण संस्थेने एस. एस. इंग्लिश मीडियम स्कुल 1999 साली सुरू केली. केवळ चार विद्यार्थी घेऊन नर्सरीचा पहिला वर्ग सुरू झाला. आज याच शाळेत 1300 पेक्षा जास्त विद्यार्थी नर्सरीपासून दहावीपर्यंतच्या शिक्षणाचे धडे घेत आहेत. या शाळेने आयएसओ नामांकन देखील प्राप्त केले आहे. संस्थापक लक्ष्मणराव देवकर यांच्या अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि कामावर असलेल्या निष्ठेमुळेच उंच शिखर गाठत शाळेची कीर्ती सर्वत्र पसरली आहे. त्यांच्या या त्रिगुणी संगमामुळेच शाळेचे विद्यार्थी इंजिनियरिंग, डॉक्‍टर, वकील, राजकारण, शिक्षक यांसह विविध क्षेत्रांमध्ये उंच भरारी घेऊ शकले आहेत. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका नंदिता भादुरी यांच्या आपुलकी व जिव्हाळ्यामुळे विद्यार्थ्यांमधील खरा माणूस निर्माण होण्यास मदत होत आहे.

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारीरिक, मानसिक विकास करण्याचा शाळा नेहमी प्रयत्न करीत असते. तंत्रज्ञानाच्या स्पर्धात्मक युगात आपला विद्यार्थी मागे पडू नये म्हणून शाळेत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विद्यार्थ्यांना घडविले जाते. त्यासाठी शाळेने ई-लर्निंग, एज्युकॉम्‌, आयमॅक्‍स अशा विविध तंत्रज्ञानाद्वारे दृकश्राव्य माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांच्या ज्ञान कक्षा रुंदावल्या जातात. पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अनुभवाने हसत-खेळत शिकावे हा हेतू शाळेचा असतो. विद्यार्थ्यांबरोबरच शाळेतील शिक्षकांचे ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी देखील नामांकित तज्ज्ञांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित केले जाते.

दहावीमधील अनेक विद्यार्थ्यांनी आपली चमक दाखवली आहे. तसेच सरकारी शिष्यवृत्ती परिक्षेत देखील अनेक विद्यार्थ्यांनी उच्चांक गाठला आहे. स्पीडबॉल, मल्लखांब, योगा, खो-खो, स्केटिंग,ऍथलेटिक्‍स, क्रिकेट अशा विविध खेळांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. स्पीडबॉल या खेळात विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत. शाळेत एनटीसी भुगोल प्रज्ञा परीक्षा, ऑलिंपियाड, हिंदी राष्ट्रभाषा यांसारख्या परीक्षा घेऊन भविष्यातील परीक्षांचा पाया मजबूत केला जातो. आजचा विद्यार्थी हा उद्याचा देश घडवणार म्हणून त्यांच्यात सामाजिक मूल्य जोपासण्यासाठी अनाथाश्रम, वृद्धाश्रम तसेच महत्त्वाचे प्रकल्पांना वेळोवेळी भेटी दिल्या जातात. जवानांना राखी पाठवून त्यांच्या प्रती कृतज्ञतेची जाणीव निर्माण केली जाते. पूरग्रस्तांना पीडितांना मदत केली जाते. पुस्तकी ज्ञानाबरोबरच सर्वगुणसंपन्न व परिपूर्ण विद्यार्थ्यांच्या रूपाने देशाचा आदर्श नागरिक घडविणारी ही शाळा प्रगतीच्या शिखरावर आहे. म्हणूनच प्रवेश घेताना पालक बिनधास्तपणे विश्‍वास ठेवतात,

Leave A Reply

Your email address will not be published.