जयपूर -राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांनी न्यायमूर्ती एस. रवींद्र भट्ट यांना राजस्थान उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती भट्ट यांनी हिंदीमध्ये शपथ ग्रहण केली. या सोहळ्याच्या प्रारंभी मुख्य सचिव डी.बी.गुप्ता यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंदद्वारा मुख्य न्यायाधीशांच्या नियुक्तीची सूचना वाचली.
दरम्यान, केरळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पीआर रामचंद्र मेनन यांनी मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेतली. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी आजी-माजी मुख्यमंत्र्यांसह राज्य मंत्रिमंडळातील अन्य सदस्य उपस्थित होते.