नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत उफाळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवरभारतीय पोलिस सेवेतील वरीष्ठ अधिकारी एस. एन. श्रीवास्ताव यांच्याकडे रविवारपासून दिल्लीच्या पोलिस आयुक्त पदाची सूत्रे सोपवण्यात येणार आहेत.
केंद्रीय राखीव पोलिस दलातून श्रीवास्ताव यांची बदली सोमवारी दिल्ली पोलिसांत केली होती. त्यांना विशेष आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) हे पद देण्यात आले होते. तेथे उफाळेल्या धार्मिक हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली होती.
दिल्लीचे पोलिस आयुक्त अमुल्य पटनाईक हे शनिवारी निवृत्त होत आहेत. त्यांच्याकडून श्रीवास्तव पदभार स्वीकारतील. पुढील आदेश निघेपर्यंत श्रीवास्तव हे दिल्लीचे पोलिस आयुक्त असतील, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे, केंद्रीय राखीव पोलिस दलात श्रीवास्तव हे विशेष महासंचालक (प्रशिक्षण) म्हणून कार्यरत होते. त्यांनी दिल्ली पोलिस दलात यापुर्वी अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यात प्रमुख म्हणजे दहशतवाद विरोधी पथकाचे ते प्रमुख होते.
दिल्ली पोलिसांत पुन्हा रुजू झाल्यापासून ते दंगल आटोक्यात व्यस्त आहेत. या दंगलीत आतापर्यंत 39 जणांणी प्राण गमावले आहेत.