एस. बालन करंडक : जीएसटी अँड कस्टम अंतिम फेरीत

सेंच्युरी क्रिकेट अॅकॅडमीशी होणार विजेतेपदासाठी लढत

पुणे – स्पोर्टसफिल्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित दुसऱ्या एस. बालन करंडक अजिंक्‍यपद टी-20 क्रिकेट स्पर्धेत रोहन मारवाहने केलेल्या नाबाद 71 धावांच्या जोरावर जीएसटी अँड कस्टम संघाने किंग्ज्‌ स्पोर्टस्‌ क्‍लबचा 7 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत जीएसटी अँड कस्टम संघाची लढत सेंच्युरी क्रिकेट ऍकॅडमी संघाशी होणार आहे.

मुंढवा येथील लिजंडस्‌ स्पोर्टस्‌ क्‍लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात किंग्ज्‌ स्पोर्टस्‌ क्‍लबने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 8 बाद 157 धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये अर्थव काळे (54 धावा), अजित गव्हाणे (32 धावा) व अत्मन पोरे (नाबाद 19) यांनी संघाचा डाव उभा केला.

या आव्हानाचा पाठलाग करताना जीएसटी अँड कस्टमचा सलामीवीर शुभम नागवडे शुन्यावर बाद झाला. यानंतर रोहन मारवाहने 52 चेंडूमध्ये 7 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 71 धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूने धीरज फटांगरेने अर्धशतकी खेळी करून रोहनला योग्य साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 72 चेंडूत 93 धावांची भागिदारी केली. यामुळे जीएसटी अँड कस्टमने 18.4 षटकात 3 गडी गमावून निर्धारित धावसंख्या पूर्ण करत अंतिम फेरी गाठली.

संक्षिप्त धावफलक –

उपांत्य फेरी ः किंग्ज्‌ स्पोर्टस्‌ क्‍लब ः 20 षटकात 8 गडी बाद 157 धावा (अर्थव काळे 54 (50, 6 चौकार, 1 षटकार), अजित गव्हाणे 32, अत्मन पोरे नाबाद 19, अक्षय करनेवार 3-15, अक्षय वाईकर 1-18) पराभूत वि. जीएसटी अँड कस्टम संघ ः 18.4 षटकात 3 गडी बाद 158 धावा (रोहन मारवाह नाबाद 71 (52, 7 चौकार, 1 षटकार), धीरज फटांगरे 50 (43, 4 चौकार, 2 षटकार), ओम भोसले नाबाद 24, मिझान सय्यद 2-30);(भागिदारीः रोहन आणि धीरज यांच्यात 93 धावा (72) सामनावीरः रोहन मारवाह

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.