एस. बालन करंडक : सेंच्युरी क्रिकेट अकादमी अंतिम फेरीत

पुणे – स्पोर्टसफिल्ड मॅनेजमेंट आयोजित दुसऱ्या एस. बालन करंडक अजिंक्‍यपद टी-20 क्रिकेट स्पर्धेत ओंकार खाटपे याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सेंच्युरी क्रिकेट अकादमी संघाने द गेम चेंजर्स संघाचा 7 गडी राखून सहज पराभव करून स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

मुंढवा येथील लिजंडस्‌ स्पोर्टस्‌ क्‍लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात द गेम चेंजर्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमावून 128 धावांचे आव्हान उभे केले. सुरुवातीच्या पडझडीनंतर यश क्षीरसागर याने 58 चेंडूत 9 चौकारांसह नाबाद 69 धावांची खेळी करून संघाचा डाव उभा केला. दिव्यांग हिंगणेकर (13 धावा) व अतुल विटकर (13 धावा) यांनी यशला साथ दिली.

या आव्हानाचा पाठलाग करताना सेंच्युरी क्रिकेट अकादमीने सावध सुरूवात केली. ओंकार खाटपे याने 52 चेंडूत 2 चौकार व 4 षटकारांसह नाबाद 56 धावांची खेळी केली. तर, अनिकेत पोरवाल याने 41 चेंडूत 43 धावांचे योगदान दिले. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी 78 चेंडूत 89 धावांची भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावर सेंच्युरी संघाने 18.2 षटकात 3 गडी गमावून 129 धावा करून स्पर्धेच्या
अंतिम प्रवेश केला. अखेरच्या साखळी सामन्यात सेंच्युरी क्रिकेट अकादमीने ईगल्स्‌ क्रिकेट क्‍लबचा 52 धावांनी पराभव करून उपांत्य फेरी गाठली होती.

संक्षिप्त धावफलक –

उपांत्य फेरी : द गेम चेंजर्स ः 20 षटकात 5 बाद 128 धावा. (यश क्षीरसागर नाबाद 69, दिव्यांग हिंगणेकर 13, अतुल विटकर 13, प्रथमेश पाटील 2-7) पराभूत वि. सेंच्युरी क्रिकेट अकादमी : 18.2 षटकात 3 बाद 129 धावा (ओंकार खाटपे नाबाद 56, अनिकेत पोरवाल 43, हितेश वाळुंज 1-19). सामनावीर – ओंकार खाटपे.

साखळी फेरी : सेंच्युरी क्रिकेट अकादमी : 20 षटकात 9 बाद 138 धावा. (यश नहार 43, किर्तीराज वाडेकर 23, मयुरेश लिखाते 2-14, शिवम पटेल 2-21) वि. वि. ईगल्स्‌ क्रिकेट क्‍लब : 20 षटकात 9 बाद 86 धावा. (विनोद राठोड 18, प्रथमेश पाटील 5-12, यश नहार 1-17). सामनावीर – प्रथमेश पाटील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.