Ruturaj Gaikwad Video : आईने नजर काढत अन् तुकडा उतरवून टाकत केलं ऋतुराजचं घरी जंगी स्वागत

पुणे – चेन्नई सुपर किंग्जच्या इंडियन प्रीमिअर लीग विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या ऋतुराज गायकवाड याचे पुण्यात आगमन झाले. यावेळी त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी त्याच्या घराजवळ चाहत्यांनी गर्दी केली होती.

ऋतुराजच्या आईने त्यांची नजर काढून आणि तुकडा उतरवून टाकत त्याला घरात घेतले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

चेन्नई सुपर किंग्जने अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा 27 धावांनी पराभव करत आयपीएल स्पर्धा जिंकली. चेन्नईच्या विजयामध्ये 24 वर्षीय ऋतुराज गायकवाड याने मोठे योगदान दिले. गायकवाड याने स्पर्धेत सर्वाधिक 635 धावा काढत ऑरेंज कॅपही पटकावली.


आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर ऋतुराज आज दुबईहून भारतात परतला. त्याचे आईने पारंपारिक पद्धतीने त्याचे स्वागत केले. गाडीतून उतरता त्याच्या आईने त्याच्या पायावर पाणी टाकले, तुकडा ओवाळून टाकला आणि त्याची नजर काढली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.