मॉस्को – रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनसोबतची शांतता चर्चा निष्फळ ठऱल्याचे म्हटले आहे. रशियाचे उद्दिष्ट साध्य होईपर्यंत आपण युक्रेनमधील लष्करी कारवाई थांबवणार नाही, असे पुतीन यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी च्यांच्यासमवेत बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को हे देखील उपस्थित होते.
रशियाला अपेक्षित करार होत नाही तोपर्यंत, लष्करी कारवाई सुरूच राहील असे पुतीन पुढे म्हणाले. किव्हच्या बाहेरील बुका शहरात शेकडो नागरिकांचे मृतदेह सापडल्याचा कथित अहवाल पुतीन यांनी फेटाळून लावला.
युक्रेनने बुका येथील हत्याकांडासाठी रशियावर आरोप केले आहेत. मात्र, रशियाने हे आरोप फेटाळले असून हा युक्रेनचा अपप्रचार असल्याचे म्हटले आहे.