काळ्या समुद्रात रशियाच्या युद्धनौका तैनात

मॉस्को – आज दोन रशियन युद्धनौकांनी काळ्या समुद्राकडे जाणाऱ्या मार्गावर बॉसफोरसच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आणि 15 लहान जहाजांनी समुद्राकडे रवाना झाल्या आहेत. पश्‍चिम आणि युक्रेनबरोबर तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्‍वभुमीवर रशियाने आपले नौदल सज्ज ठेवले आहे. 

काळ्या समुद्रात रशियाने यापूर्वीच आपली युद्धसज्जता वाढवली आहे. युक्रेनच्या युद्धसामुग्रीच्या अनुषंगाने रशियाने आपली युद्धसज्जताही वाढवली आहे. पूर्व युक्रेनमधील बंडखोरांना रशियाचे पाठबळ आहे. युक्रेनच्या सरकारविरोधात रशियाचा हा संघर्ष दीर्घकाळापासून सुरू आहे. आपली युद्धसज्जता केवळ संरक्षणाच्या हेतूने असल्याचे रशियाने म्हटले आहे. तसेच ही तात्पुरती व्यवस्था असल्याचेही रशियाने म्हटले आहे. 

रशियाच्या या हालचालींवर पश्‍चिमेकडून अमेरिकेनेही बारीक लक्ष ठेवले आहे. सायबर हॅकिंगच्या मुद्‌द्‌यावरून अमेरिकेने रशियाच्या काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची हकालपट्टीही केली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा वाढला आहे.

कथित गैरवर्तन कारवायांवरून अमेरिकेतून इतक्‍या मोठ्या संख्येने रशियन मुत्सद्दी हद्दपार केल्याचा बदला घेण्यासाठी रशियानेही काल 10 अमेरिकन मुत्सद्दी लोकांना हद्दपार केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.