रशियातील निवडणूकीत पुतीन यांच्या पक्षाची सरशी नक्की

मॉस्को – रशियातील निवडडणूकच्या प्रारंभच्या निकालांनुसार क्रेमलीनचे समर्थन असलेल्या आणि अध्यक्ष ब्लादिममिर पुतीन यांच्या युनायटेड रशिया पार्टीला मोठी आघाड मिळत असल्याचे दिसून आले आहे. मात्र त्यांच्या पक्षाला दोन तृतीयांश बहुमत मिळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राज्यघटनेमध्ये बदल करायचा असेल तर पुतीन यांच्या पक्षाला दोनतृतीयांश बहुमत मिळणे आवश्‍यक आहे.

रशियातील अध्यक्षपदाच्या निवडणूका 2024 मध्ये होणार आहेत. त्यापाश्‍वभुमीवर सत्तेवर आपली पकड अधिक घट्ट करण्यासाठी पुतीन यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे.
देशातल 30 टक्के मतदार केंद्रांवरील मतमोजणीनुसार पुतीन यांच्या पक्षाला 45 टक्के मते मिळाल आहेत. युनायटेड रशिया पार्टीच्या यादीतून एकूण 225 उमेदवार नियुक्‍त केले आहेत. तर उर्वरित 225 उमेदवार सर्वसामानयांमधून निवडण्यात येणार आहेत. एका मतदारसंघातील 149 मतदार केंद्रांमध्ये युनीायटेड रशिया पार्टी आघाडीवर असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

देशातील प्रमुख विरोधी नेते ऍलेक्‍सी नवालनी यांना कट्टरवादी ठरवण्यात आल्याने या निवडणूकीमध्ये विरोधकांचा प्रभाव जवळ जवळ शून्य झाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.