मारेत अल नुमान (सिरीया): वायव्य सिरीयामधील एका बाजारपेठेवर रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये किमान 27 जण ठार झाले आहेत. सिरीयातील निरीक्षकांनी ही माहिती दिली. मात्र रशियाने आपण हा हल्ला केला नसल्याचे म्हटले आहे. आपल्याबाबतचे हे वृत्त खोटे असल्याचे रशियाने म्हटले आहे. रशियाची लढाऊ विमाने सिरीयाशी संबंधित कोणत्याही मोहिमेवर गेलेली नव्हती, असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
जिहादींच्या ताब्यात असलेल्या इडिब प्रांतात सुमारे 30 लाख लोक राहतात. महिन्याभरापूर्वीच्या आंतरराष्ट्रीय करारानुसार या भागाचे संरक्षण होणे अवस्यक आहे. मात्र या भागावर सिरीयातील राजवट आणि सिरीयाचा मित्र रशियकडून एप्रिल महिन्यापासून मोठा बॉम्बवर्षाव केला जात आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 650 पेक्षा अधिक् नागरिक मारले गेले अहेत. सिरीयातून गेल्या तीन महिन्यत सुमारे 3 लाख 30 हजार नागरिकांनी पलायन केले आहे.