मॉस्को – रशियातील चित्रपट उद्योगाने अमेरिकेतील हॉलिवूडला मागे टाकण्यासाठी आता थेट अंतराळात चित्रपटाचे शुटिंग करण्याची योजना आखली आहे. त्यासाठी एक अभिनेत्री आणि डायरेक्टरने आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवरून उड्डाण केले.
अंतराळात शुटिंग करण्याची कल्पना “मिशन इंपॉसिबल’चा स्टार टॉम क्रूज याने गेल्या वर्षी या प्रोजेक्टची घोषणा केली होती. या प्रोजेक्टमध्ये नासा आणि इयॉन मस्क यांच्या स्पेसेक्स कंपनीलाही सहभागी करून घेतले गेले आहे. मात्र त्यापूर्वीच रशियाने अंतराळातील शुटिंगला सत्यात उतरवण्याचे पाऊल उचलले आहे.
रशियातील अभिनेत्री युलिया पेरेसिल्ड आणि डायरेक्टर क्लीम शिपेंको यांनी सोव्हिएत रशियाचा पूर्वी भाग असलेल्या कझाकस्तानमधील बोयकोनूर कॉसमोद्रोव येथून अंतराळात उड्डाण केले. सोयुझ-एमएस 19 हे अंतराळ यान आता अंतराळात सुस्थिर झाले असल्याचे अभिनेत्री, डायरेक्टर आणि अंतराळवीर ऍन्टोन श्खाप्लेरोव्ह यांनी सांगितले. तीन तासांनंतर हे अंतराळ यान आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर उतरले.
या चित्रपटाचे नाव “चॅलेंज’असे असणार आहे. त्यामध्ये अभिनेत्री युलिया पेरेसिल्ड ही एक सर्जन असणार आहे. तिला तातडीच्या सर्जरीसाठी अंतराळ स्थानकावर पोहोचवण्यात येते, अशी कथा आहे.