कीव (यूक्रेन) – भारतीय नागरिकांसाठी युक्रेनमधील दूतावासाकडून नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांनुसार भारतीय नागरिक युक्रेनच्या पश्चिमेकडे स्थलांतर करु शकतात. मात्र, आपल्यासोबत आपले पासपोर्ट आणि गरजेची कागदपत्र सोबत बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासोबत दूतावासाकडून हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आले आहे.
युद्धामुळे युक्रेन विमानतळ बंद करण्यात आले आहे. भारतीय नागरिकांना मायदेशात परत आणण्यासाठी पर्यायी मार्गाचा विचार केला जात आहे. अडचणीत असलेले नागरिकांना मदतीसाठी दुतावासाच्या वेबसाईट, सोशल मीडिया आणि दूरध्वनी क्रमांकवर संपर्क साधता येणार आहे. या शिवाय दूतावासाने हेल्पलाईन नंबर देखील जारी केला आहे. मदतीसाठी नागरिकांना +38 0997300428, +38 0997300483, +38 0933980327, +38 0635917881, +38 0935046170 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.