Russia-Ukraine war । रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे, रशिया युक्रेनचे कंबरडे मोडण्यासाठी सतत प्रयत्न करताना दिसून येत आहे. शनिवारी, रशियाने डोनेस्तक प्रदेशातील आणखी एक युक्रेनियन गाव ताब्यात घेतल्याचा दावा केला. रशियाच्या या दाव्यावर अद्याप युक्रेनकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. याआधी रशियाने युक्रेनच्या चेरनोबिल अणुऊर्जा प्रकल्पावर ड्रोनने हल्ला केला होता.
रशिया युक्रेनवर सतत हल्ले करत आहे. हळूहळू रशिया युक्रेनच्या ज्या भागात युक्रेनियन सैन्य कमकुवत आहे त्या भागात हल्ले तीव्र करत आहे. म्हणूनच युक्रेन आपली जमीन गमावत आहे. गेल्या ३ वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत.
रशियाने ताब्यात घेतलेले गाव खूपच लहान Russia-Ukraine war ।
रशियाने ज्या गावावर कब्जा केल्याचा दावा केला आहे ते गाव खूपच लहान वस्तीचे आहे. बेरेझिव्हका ताब्यात घेतल्याने डोनेस्तक प्रदेशात रशियाचे वर्चस्व वाढेल. रशियाला संपूर्ण डोनेस्तक आणि शेजारील लुहान्स्कवर नियंत्रण ठेवायचे आहे, जे एकत्रितपणे युक्रेनचा डोनबास औद्योगिक प्रदेश बनवतात.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले, शनिवारी रात्रीपर्यंत पश्चिम आणि नैऋत्य रशियाच्या चार भागात ४० युक्रेनियन ड्रोन पाडण्यात आले आहेत आणि त्यात कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही.युक्रेनियन अधिकाऱ्यांनी सांगितले की मॉस्कोने शनिवारी रात्रीपर्यंत युक्रेनमध्ये ७० ड्रोन पाठवले होते, परंतु त्यांच्या हवाई दलाने ३३ ड्रोन नष्ट केले आणि ३७ इतरत्र बेपत्ता झाले.
दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीची चर्चा सुरू Russia-Ukraine war ।
रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता चर्चा सुरू असताना हा हल्ला करण्यात आला आहे. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धाला लवकरच तीन वर्षे पूर्ण होत आहेत. युक्रेनचा दावा आहे की युद्धाच्या आघाडीवर अजूनही संघर्षाची परिस्थिती कायम आहे.
तथापि, दोन्ही देशांनी युद्धबंदीबाबत चर्चा करण्यास सहमती दर्शविली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी दोन्ही देशांशी युद्धबंदीबाबत चर्चा केली. जिथे दोघांनीही रशिया-युक्रेन युद्धात होणारे लाखो मृत्यू थांबवण्याची गरज आहे यावर सहमती दर्शवली.
हेही वाचा
संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश