मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या रशिया आणि युक्रेनच्या तणावाचे वातावरण असल्याने याचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय स्तरावर मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,६९० रुपये आहे.
मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,०१० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६७,२०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,६९० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,९४० प्रति १० ग्रॅम आहे.
पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,८१० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,१२० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,७४० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,९९० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६७२ रुपये आहे.