Russia-Ukraine: युक्रेनने डागलेली तब्बल १५८ ड्रोन हवेतच नष्ट केल्याचा दावा रशियाने केला आहे. यापैकी दोन ड्रोन राजधानी मॉस्कोवर उडत होती तर ९ मॉस्कोच्या आजूबाजूच्या भागांमध्ये उडत होती. युक्रेनने सध्या रशियाच्या ज्या प्रांतात घुसखोरी केली आहे, त्या कुर्स्क प्रांतात ४६ ड्रोन डागण्यात आली होती, असेही रशियाने म्हटले आहे.
युक्रेनने केलेला हा ड्रोन हल्ला प्रत्यक्ष युद्धभूमीपासून रशियाच्या मध्यवर्ती भागापर्यंत करण्यात आला होता. या वर्षात प्रथमच युक्रेनने रशियाच्या इतक्या आतपर्यंत जाणारी ड्रोन डागली होती.
रशियाकडून होत असलेल्या हल्ल्यांमधील ताकद कमी करण्यासाठी रशियाचे तेलशुद्धिकरण प्रकल्प आणि ऑईल टर्मिनलना या ड्रोनद्वारे लक्ष्य करण्याचा प्रयत्न युक्रेनने केला आहे.