भारताची चिंता वाढणार? रशिया पाकिस्तानला देणार आधुनिक शस्त्रास्त्रे

इस्लामाबाद –  भारत भेटीनंतर पाकिस्तान दौऱ्यावर गेलेले रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेऊ लावरोव यांनी रशिया पाकिस्तानला काही शस्त्रे देणार असून रशिया आणि पाकिस्तानमध्ये लष्करी सहकार्यदेखील वाढणार असल्याची तेथे घोषणा केली आहे. त्यामुळे भारताची चिंता वाढणार आहे.

जवळपास एक दशकानंतर रशियाच्या परराष्ट्र मंत्र्याने पाकिस्तानचा दौरा केला आहे. लावरोव यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांच्यासोबत प्रतिनिधीमंडळ स्तरावर चर्चा केली. या चर्चेत अर्थव्यवस्था, व्यापार, दहशतवाद, संरक्षण आदी मुद्यांवर चर्चा झाली. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर सहमती झाली.

पाकिस्तानला विशेष शस्त्रांचा पुरवठा करण्यासह दहशतवादविरोधात लढण्यासाठी क्षमता वाढवण्यासाठी आम्ही तयार आहोत. दोन्ही देशांमध्ये एकत्रितपणे युद्ध सराव करण्यासही सहमती दर्शवण्यात झाली असल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तानला कोणत्या प्रकारची शस्त्रे देण्यात येणार याबाबत कोणतेही भाष्य करण्यात आले नाही. लावरोव यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा यांच्यासोबत चर्चा केली.

पाकिस्तानही शांघाई सहकार्य संघटनेचा सदस्य देश असल्यामुळे रशिया पाकिस्तानसोबत आपले संबंध विकसित करत आहे. असे रशियाकडून सांगितले जाते आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.