डोपिंगप्रकरणी वाडाची रशियावर कडक कारवाई

रशियावर ४ वर्षासाठी घातली बंदी

नवी दिल्ली : ‘वाडा’ म्हणजेच ‘वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी’ने सोमवारी डोपिंगच्या आरोपाखाली रशियावर ४ वर्षांसाठी बंदी घातली आहे. या बंदीमुळे आता रशियाचा कोणताही खेळाडू आगामी टोकियो ऑलिम्पिक आणि विश्वचषक स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही.

वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीने सोमवारी झालेल्या विशेष बैठकीनंतर हा महत्वपूर्ण निर्णय घेतला. रशियाकडून डोपिंगबाबत चुकीची माहिती देण्यात आली. रशियन खेळाडूंचा चुकीचा डोपिंग अहवाल ‘वाडा’ कडे पाठविला गेला होता. तो आरोप रशियाच्या शासकीय क्रीडा समित्यांसह मान्य करण्यात आला. तेव्हापासून हा वाद क्रीडा जगात चर्चेत होता. वाडा प्रवक्ता यांच्या माहितीनुसार रशियाला प्रतिबंधासह निलंबित करण्याचा निर्णय हा सर्वाच्या सहमतीनं घेण्यात आला आहे.

त्यानंतर अखेर आज (सोमवारी) वाडाने रशियावर ४ वर्षांची ऑलिम्पिकबंदी घातली. त्यामुळे पुढील ४ वर्षे रशियाचा ध्वज, राष्ट्रगीत आणि संघाचे नाव ऑलिम्पिकमध्ये कुठेही पाहायला अथवा ऐकायला मिळणार नाही.

‘वाडा’ने याबाबतीत असंही सांगितल की, जर रशिया विरोधी डोपिंग एजन्सीने (RUSADA) बंदी विरोधात अपील केलं तर, हे प्रकरण कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फाॅर र्स्पोट (CAS) कडे पाठवलं जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.