रशियाविरुद्धच्या युद्धात लढताना ठार झालेल्या युक्रेनच्या 501 सैनिकांचे मृतदेह रशियाने शुक्रवारी युक्रेनला परत दिले. रशिया-युक्रेन दरम्यानचे युद्ध सुरू झाल्यापासून प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने मृत सैनिकांचे मृतदेह परत दिले गेले आहेत.
युक्रेनच्या या सैनिकांपैकी बहुतेक जण युक्रेनच्या दोनेत्सक या पूर्वेकडील प्रांतातल्या लढाईदरम्यान मारले गेले होते. यातील अवडिव्का शहर दीर्घकाळ चाललेल्या लढाईनंतर रशियाच्या सैन्याने फेब्रुवारीमध्ये जिंकले होते. त्या लढाईदरम्यान हे सैनिक मारले गेले होते, असे युक्रेनच्या युद्धकैद्यांच्या उपचारासाठी समन्वय मुख्यालयाने सांगितले.