माॅस्को : विश्व डोपिंग विरोधी एजन्सीने (वाडा) डोपिंग उल्लंघनप्रकरणी जगातील प्रमुख स्पर्धामध्ये पुढील चार वर्षे सहभागी होण्यास रशियावर बंदी घातली आहे. या निर्णायाला शुक्रवारी रशियाने औपचारिक रित्या आव्हान दिले आहे.
WADA receives notice of RUSADA’s dispute of Agency’s Executive Committee decision: https://t.co/TNssElCNW7
— WADA (@wada_ama) December 27, 2019
रशियाच्या डोपिंगविरोधी एजन्सीचे महासंचालक युरी गानूस यांनी माॅस्को येथील पत्रकार परिषदेत यासंबंधी माहिती दिली आहे. ‘नियमीत प्रक्रियेनुसार आम्ही सर्व दस्तावेज वाडाकडे पाठविले आहेत. यामध्ये वाडाच्या निर्णयास आव्हान देणारी नोटीस देखील आहे’ अशी माहिती त्यांनी दिली आहे.
दरम्यान, वाडाने ९ डिसेंबर रोजी रशियाकडून डोपिंगबाबत चुकीची माहिती दिल्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करत ४ वर्षासाठी बंदी घातली होती. यामुळे रशियाचा कोणत्याही खेळाडूला आगामी टोकियो आॅलिम्पिक आणि विश्वचषक स्पर्धेत भाग घेता येणार नाही. त्यानंतर लगेचच रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी रशियावर घालण्यात आलेली बंदी अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया दिली होती