रशियाचे करोनावर आणखी एक औषध

मॉस्को – करोनावरील उपचारात उपयुक्त ठरणाऱ्या आणखी एका औषधाला रशियाने मंजुरी दिली आहे. या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात हे औषध बाजारात उपलब्ध होणार आहे.

अविफॅव्हिर नंतर रशियाचे हे दुसरे औषध आहे. योग्य सल्ला घेतल्यानंतर ते रूग्णाला दिले जाणार आहे. जपानमध्ये संसर्गावरील उपचाराकरता दिल्या जाणाऱ्या फॅव्हिपिरावीरवर रशियाचे हे नवे औषध आधारित आहे.

रशियाने अगोदरच करोनावर लस विकसित केल्याचा दावा केला आहे. स्पुटनिक 5 असे त्या लशीचे नामकरणही करण्यात आले आहे. या लशीच्या निर्मिती आणि वितरणासाठी त्यांनी अनेक कंपन्यांशी करारही केले आहेत.

आताचे नवे औषध आर- फर्माने तयार केले असून क्‍लिनिकल चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यानंतर त्याला परवानगी देण्यात आली आहे. 168 जणांवर या औषधाची चाचणी घेण्यात आली आहे.

आर फार्माने या औषधाच्या संदर्भात औषध कंपन्यांशी अगोदरच बोलणी सुरू केली आहे. नजिकच्या भविष्यात करोनावरच्या औषधांची उपलब्धता कमी होण्याची शक्‍यता असल्यामुळे या औषधाला लवकरात लवकर बाजारात आणणे आवश्‍यक असल्याचे आर फार्माच्या प्रवक्‍त्याने म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.