तेल उत्पादन कमी करण्यावर रशिया आणि सौदीचे एकमत

ओसाका – जगात तेलाचा विपुल पुरवठा सुरू असून आता भाव वधारेपर्यंत तेल उत्पादनावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय सौदी अरेबिया आणि रशियाने घेतला आहे. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. पण आणखी किती महिने हा निर्णय लागू राहील असे विचारता पुतीन म्हणाले की त्यावर परिस्थिती लक्षात घेऊन उपाययोजना केली जाईल पण सरासरी सहा ते नऊ महिने तरी हे उत्पादन कमी ठेवले जाईल.

ओपेक या तेल उत्पादक देशांनीही गेल्या डिसेंबर पासून दररोज 1.2 दशलक्ष बॅरलने उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.ओपेक ही 14 तेल उत्पादक देशांची संघटना आहे. या संघटनेची महत्वाची बैठक व्हीएन्न येथे येत्या मंगळवारी होत असून त्यांनीही जागतिक स्थिती लक्षात घेऊन तेल उत्पादनाच्या संबंधात निर्णय घ्यायचे ठरवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.