रशिया-चीन मिळून करणार चंद्राबाबत संशोधन

बीजिंग – चंद्राच्या पृष्ठभागावर चंद्र संशोधन स्टेशन तयार केले जाणार असल्याचे चीन आणि रशियाने म्हटले आहे. दोन्ही देशांमधील अंतराळ सहकार्यात नवीन पर्वाची सुरूवात या निमित्ताने होणार आहे. आंतरराष्ट्रीय चंद्र संशोधन केंद्र इतर देशांद्वारे वापरण्यासाठी खुले असेल, असे चीनच्या राष्ट्रीय अंतराळ संस्थेच्या वेबसाईटवर बुधवारी पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे. परंतु हे चंद्र संशोधन केंद्र कधी बांधले जाणार आहे, याचे कोणतेही वेळापत्रक दिलेले नाही.

हे संशोधन केंद्र म्हणजे सर्वसमावेशक वैज्ञानिक प्रयोगांचा तळ असेल. यामध्ये दीर्घकाळासाठी खगोलशास्त्रीय कार्य केले जाऊ शकेल. हे संशोधन स्टेशन चंद्राच्या पृष्ठभागावर किंवा चंद्राच्या कक्षेत तयार केले जाईल. या संशोधन केंद्रातून चंद्राबाबतचे संशोधन, चंद्राच्या माध्यमातील निरीक्षणे, प्राथमिक वैज्ञानिक प्रयोग आणि तांत्रिक पडताळणी केली जाऊ शकणार आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.

या प्रकल्पाबाबत मंगळवारी चीनची राष्ट्रीय अंतराळ संस्थेचे व्यवस्थापक झॅंग केजियान आणि रशियाची अंतराळ संस्था रोस्कोस्मोसचे प्रमुख दिमित्री रोगोझिन यांच्यात मंगळवारी एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. चीनने अंतराळाशी संबंधित उपक्रम सुरू केल्यापासून रशियाच्या तंत्रज्ञानावर विशेष भर दिला आहे. मात्र 2003 मध्ये पहिली चांद्रमोहिम सुरू केल्यापासून स्वतःच वेगळा मार्ग निवडायला सुरुवात केली आहे. असे असले तरीही, चीनचे शेनझोऊ स्पेसशिप रशियाचे सोयुझ कॅप्सूलमध्ये खूप साम्य आहे. चीनच्या अंतराळ संस्थेने जगभरातील बहुतेक देशांबरोबर मिळून काम केले आहे. मात्र अमेरिकेने नासा आणि चीन दरम्यान सहकार्य करण्यास मनाई केलेली आहे. चीनकडून तंत्रज्ञानाची चोरी होऊ शकते, अशी अमेरिकेची भूमिका आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.