जळगाव – सिनेमागृहे बंदच असल्याने आणि नवीन सिनेमे प्रदर्शित होण्याचे थांबल्याने किंवा काही सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर वितरीत होत असल्याने आता रसिकांनी आपला मोहरा युट्युबकडे वळवला आहे. सध्या या युट्युबवर खानदेश वाहिनीचं एक फाडू गाणं धुमाकूळ घालत असून, या गाण्यानं कमी कालावधीत 20 हजार विव्हर्सचा टप्पा ओलांडला असून वेगाने हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
तू माझी पिन्टी, मी तुझा पिंटू
ये ना जवळी तू, माझ्या प्रीतीची राणी तू
तुला पाहून कळीज करतंय वंटु वंटु वंटु…
असे मजेशीर असे या गाण्याचे बोल असून प्रतिभा गजरमल यांच्या गीताला सचिन कुमावत या खानदेशातील संगीतकाराने संगीत दिलं आहे. गाणं पहायचं/ऐकायचं असेल तर ही लिंक क्लिक करा आणि हेडफोन्स अवश्य लावा…
बिलाल तडवी याने आपल्या उडत्या आवाजात गायलेल्या या गाण्याला पडद्यावर साकारलं आहे ते अभिलाष जोशी आणि वैष्णवी शिंपी यांनी. या संपूर्ण चित्रीकरणात ड्रोनचा मुक्तपणे वापर करण्यात आला असून हृषिकेश चौधरी यांची सिनेमॅटोग्राफी आहे, तर व्हिडीओ एडिटींग अल्पेश कुमावत यांचे आहे.
आजच्या तरुणाईच्या प्रेमभावनेचं सहीसही सादरीकरण असलेल्या या गाण्याला जनरेशन-नेक्स्टने उचलून धरलं असून वेगाने हा व्हिडीओ सोशल मिडीयात शेअर केला जात आहे.