रांजणगावातून सातजण ताब्यात ः पाच जणींची सुटका
रांजणगाव गणपतीश-येथील पुणे-नगर महामार्गावर बारामती क्राइम ब्रॅंचच्या पथकाने वेश्या व्यवसायावर कारवाई करून सात जणांना ताब्यात घेतले.
महेश उर्फ बापुण, सुमित साहू (दोघे रा. रांजणगाव), संदीप बळवंत येंधे (रा. जुन्नर), राजू पित्तवास साहू, संतोष लोकनाथ बेहरा (दोघे रा. ओडिसा), नारायण संजय दुधाटे, (रा. परभणी), राकेश उर्फ लूफताद रहमान शेख अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. अत्यंत वर्दळीच्या रांजणगाव परिसरात हॉटेल मुक्ताई व हॉटेल गारवा या ठिकाणी पोलिसांनी छापा घातला. यावेळी पोलिसांना तेथे कॉन्ट्रॅक्टवर आणलेल्या 5 परप्रांतिय वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
याबाबतची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना बातमीदार मार्फत मिळाली असता त्यांनी बारामती क्राइम ब्रॅंचचे प्रमुख चंद्रशेखर यादव यांना छापा मारण्यास सांगितले. बारामती क्राइम ब्रॅंचचे पोलीस कर्मचारी आणि रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत आणि जवान यांच्यासह अचानक हॉटेल मुक्ताई व हॉटेल गारवा या ठिकाणी छापा टाकला असता हॉटेल मुक्ताई येथे तीन परप्रांतीय महिला (पश्चिम बंगाल) व हॉटेल गारवा येथे दोन परप्रांतीय (पश्चिम बंगाल) महिला यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असताना मिळून आले.