“विकासासाठी ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा’

नारायणगाव – नारायणगाव (ता. जुन्नर) च्या विकासासाठी आणि स्वच्छतेसाठी वृक्षारोपण, प्लॅस्टिक बंदी, मीनाई स्वच्छता अभियान, कचराकुंडी मुक्त या सर्व अभियानांमध्ये नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांनी केले.

नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षदिंडी काढून परिसरातील नागरिकांना 2 हजार 500 फळझाडे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच पाटे बोलत होते. यावेळी उपसरपंच मनीषा मेहेत्रे, आशिष माळवदकर, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्‍वर औटी, डॉ. अमोल बेनके, अनिल दिवटे, वनरक्षक पवन आहेर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पंचायत समिती सदस्या अर्चना माळवदकर यांच्या निधीतून हाय मॅक्‍स लाईट बसविण्यात आले त्याचे उदघाटन करण्यात आले.

या कार्यक्रमानिमित्त संतोष खैरे, दिलीप गांजळे, सुजित खैरे, रमेश पाटे, ज्ञानेश्‍वर लोखंडे, जितेंद्र गुंजाळ, दीपक वारुळे, शिरीष जठार, अनिल खैरे, हेमंत कोल्हे, डॉ. काचळे, राजेंद्र बोरा, बाळासाहेब पाटे, डी. के. भुजबळ, एकनाथ शेटे, शंकर कोल्हे, सुधीर खैरे, पांडू मेहेत्रे, दीपक डेरे, सुधीर जोरी, वासुदेव कानसकर, वासुदेव पाटे, सुहास तोडकरी, सचिन खैरे, जयेश कोकणे, अजित वाजगे, संदीप खेबडे, बाळा वाव्हळ, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पाटे, राजेश बाप्ते आणि ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे यांनी आभार मानले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)