मेष : व्यवसाय नोकरीत तुम्ही प्रत्येक काम मनासारखे कराल. तुमचे मत इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. कामात कार्यतत्पर रहाल. कौतुकास पात्र काम हातून घडेल. नोकरीत महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील. महिलांचा खर्च वाढला तरी तो योग्य कारणासाठीच असेल. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. कलाकार, खेळाडूंना यशप्राप्ती होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साधता येईल.
वृषभ : सर्व महत्त्वाचे ग्रह अनुकूल असल्याने व्यवसायात रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. पैशाची चिंता मिटेल. देणी देता आल्याने मनावरचा ताण दूर होईल. नोकरीत वरिष्ठांनी सोपवलेली कामगिरी यशस्वी पार पाडाल. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. काहीतरी नवीन करून दाखवण्याची खुमखुमी येईल. महिलांना कर्तव्य चोख केल्याचे समाधान मिळेल. मन:स्वास्थही लाभेल. विद्यार्थ्यांना यशदायक ग्रहमान.
मिथुन : रवी साथ देणारा असल्याने अडथळे दूर होतील. व्यवसायात अनुकूल घटना घडतील. मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा घेण्याकडे तुमचा कल राहील. नोकरदार व्यक्तींना मनाप्रमाणे कामे केल्याचे समाधान मिळेल. वेळेचे गणित अचूक जमेल. बेकार व्यक्तींना कामधंदा मिळेल. महिलांना सुवार्ता कळेल. विवाहोत्सुकांचे विवाह जमतील. आरोग्यात सुधारणा होईल. विद्यार्थ्यांना अपेक्षेप्रमाणे मार्क मिळतील.
कर्क : व्यवसायात आवक पेक्षा जावक जास्त होईल. कामाच्या नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. बेफिकीर राहून चालणार नाही. नोकरीत प्रलोभनांपासून चार हात लांब राहणे चांगले. बोलण्यातून गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. महिलांचा नको त्या कामात वेळ जाईल. विद्यार्थ्यांनी अतिआत्मविश्वास टाळावा. तरुणांनी अतिसाहस करू नये. कामाचा सपाटा राहील.
सिंह : साहस व धडाडी राहील. कामांना गती देण्यासाठी तत्पर रहाल. व्यवसायात कामाचा उरक दांडगा असेल. हितचिंतक मदत करतील. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. बेकार व्यक्तींना कामधंदा मिळेल. नोकरीत वरिष्ठ आवळा देऊन कोहळा काढत नाहीत याची खात्री करा. तुमच्या मागण्या मूड पाहून मांडा व मान्य करून घ्या. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. महिलांना मुलांकडे लक्ष द्यावे लागेल.
कन्या : अंगी असलेले सुप्त कलागुण दाखवण्याची संधी मिळेल. व्यवसायात घेतलेले निर्णय अचूक ठरतील. महत्त्वाची कामे स्वत: करून इतर कामे गोड बोलून सहकाऱ्यांकडून करून घ्याल. नवीन कामाची संधी मिळेल. नोकरदार व्यक्तींना केलेल्या कामात समाधान मिळेल. बढतीचे योग येतील. प्रवास घडेल. महिलांनी दगदग धावपळ कमी करावी. अविश्वास न दाखवता कामे इतर व्यक्तींवर सोपवावीत.
तुळ : सकारात्मक दृष्टिकोन राहील. नवीन कामे मिळण्यासाठी प्रयत्न कराल. व्यवसायात तांत्रिक अडथळ्यांवर मात करून उलाढाल वाढवाल. खेळत्या भांडवलाची तरतूद होईल. अर्धवट कामे मार्गी लागतील. नोकरीत कामाचा उरक दांडगा राहील. सहकाऱ्यांनाही कामात मदत कराल. जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई करता येईल. गैरसमज मात्र टाळा. महिलांनी स्पष्टवक्तेपणा टाळावा.
वृश्चिक : “”आधी केले मग सांगितले” या उक्तीप्रमाणे वागाल. अशक्य वाटणाऱ्या कामात यश संपादन कराल. तडजोडीचे धोरण स्वीकारून फायदा करून घ्याल. नोकरीत अहंपणा सोडून सहकाऱ्यांना मदत करा. कामातील बेत गुप्त ठेवा. तुमच्या वागण्याबोलण्याने इतरांची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. घरात स्वत:चेच म्हणणे खरे करण्याचा अट्टाहास धरू नका. इतरांचेही विचार जाणून घ्या.
धनु :मनातील सुप्त इच्छा पूर्ण होतील. “रात्र थोडी सोंगे फार’ अशी स्थिती होईल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. दगदग धावपळ वाढेल. नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नोकरीत तुमचे अंदाज अचूक येतील. वरिष्ठांची शाबासकी मिळेल. हातून योग्य कृती होईल. महिलांना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कार्यतत्पर राहून कामे करावी लागतील. मनोबल वाढेल. विद्यार्थ्यांनी केलेली उजळणी फायदेशीर ठरेल.
मकर : वातावरणाची अनुकूलता कामांना गती देईल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तरतूद केलेली लाभदायक ठरेल. व्यवसायात अडथळ्यांवर मात करून यश मिळवाल. अर्थप्राप्ती चांगली होईल. अनपेक्षित लाभाची शक्यता. नोकरीत विरोधक सामंजस्याची भाषा बोलतील. तुमचे महत्त्व वाढेल. महिलांना नवीन व्यक्तींचा सहवास लाभेल. सुवार्ता कळेल. प्रकृतीमान सुधारेल. गृहसौख्याचा आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना अनपेक्षित यश मिळेल.
कुंभ : व्यवसायात कल्पकता दाखवून कामे कराल. व्यवहारी दृष्टीकोन ठेवून कामे हाती घ्याल. नवीन कामे ओळखीतून मिळतील. नोकरीत पैशाच्या मोहापासून दूर रहा. कामात चोख रहा. जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई करता येईल. नवीन प्रशिक्षणासाठी वरिष्ठ तुमची निवड करतील. महिलांना घरगुती प्रश्न इतरांची मन न दुखवता सोडवता येतील. मन:स्वास्थ्य मिळेल. विद्यार्थ्यांना केलेल्या कष्टाचे फळं मिळेल.
मीन : व्यवसायात श्रमसाफल्याचा अनुभव येईल. पूर्वी केलेल्या कामातून आता पैसे मिळेल. पैशाची चिंता मिटेल. नवीन गुंतवणुकीमुळे खिशावर ताण येईल. नोकरीत मनाप्रमाणे कामे करता येतील. सामुहिक कामात प्रगती कराल. सरकारी कामात यश येईल. महिलांना मोठ्या व्यक्तींकडून कौतुकाची थाप मिळेल. कमी श्रमात जास्त यश संपादन कराल. नवीन खरेदीचे बेत सफल होतील. विद्यार्थ्यांना यशदायक ग्रहमान.