मेष : चांगली बातमी कळेल
मानसिक आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात भावनेपेक्षा कर्तव्याला श्रेष्ठ मानून कामे कराल. यशाची कमान उंचावेल. नोकरीत ओळखीचा उपयोग होईल. अपेक्षित पत्रे हाती येतील. महिलांना चांगली बातमी कळेल. सणासुदीच्या निमित्ताने नवीन खरेदी कराल. कलाकार, खेळाडूंना मानमरातब, प्रसिद्धी मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात दिरंगाई करू नये.
वृषभ : व्यवसायात फायदा
योग्य वेळी घेतलेले निर्णय व्यवसायात फायदा मिळवून देतील. नवीन कामे मिळतील. स्वतःची कुवत ओळखून पुढे जा. नोकरीत कामाचा मनस्वी कंटाळा आला असेल, तर छोटी सहल काढा. आवडत्या छंदात वेळ रमवाल. महिलांनी अनावश्यक खर्च करू नयेत. नव्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा ताण घेऊ नये.
मिथुन :सुवार्ता कळेल
व्यवसायात, नोकरीत प्रगती होईल. बेरोजगारांना नोकरी मिळेल. अतिस्पष्टवक्तेपणामुळे त्रास होण्याची शक्यता. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. परदेशगमनाचे योग येतील. प्रियजन व आप्तेष्ट यांच्या सहवासाने महिलांना आनंद होईल. सुवार्ता कळेल. नवीन घराचे स्वप्न साकार होईल. विद्यार्थ्यांना यशदायी ग्रहमान.
कर्क :अनपेक्षित लाभ
कामाची योग्य आखणी केल्याने यश संपादन कराल. अर्धवट राहिलेली कामे गती घेतील. व्यवसायात विस्ताराच्या कल्पना फलद्रूप होतील. नोकरीत वरिष्ठांना तुमचे व तुमच्या कामाचे महत्त्व कळून येईल. कौतुकास पात्र असे काम हातून घडेल. अनपेक्षित लाभ होतील. घरकामात महिलांचा वेळ मजेत जाईल. नवीन खरेदी होईल. आरोग्य उत्तम राहील.
सिंह : यश संपादन कराल
महत्त्वाचे ग्रह अनुकूल आहेत, तेव्हा तुमचा उत्साह वाढता राहील. व्यवसायात बदल करून फायदा मिळवून देणाऱ्या कामांवर लक्ष केंद्रित करा. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. जुनी येणी येतील. नोकरीत वरिष्ठ महत्त्वाची कामे तुमच्यावर सोपवतील. त्यात यश संपादन कराल. कामानिमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील. महिलांचा वेळ पाहुण्यांच्या दिमतीत जाईल.
कन्या : व्यवहारी दृष्टिकोन ठेवा
व्यवसायातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सतर्क राहावे लागेल. व्यवहारी दृष्टिकोन ठेवून कामे हाताळा. कामात गरजेप्रमाणे लवचिक धोरण ठेवा. नोकरीत वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन करा. मूड बघून तुमच्या मागण्या मान्य करून घ्या. कामानिमित्ताने प्रवास घडेल. महिला गृहसजावटीसाठी पैसे खर्च करतील. मनाप्रमाणे कामे झाल्याने आनंद मिळेल.
तुळ :नवीन कामे मिळतील
व्यवसायात अनपेक्षित चांगले बदल होतील. हितचिंतकांच्या मदतीने नवीन कामे मिळतील. तुमचे घेतलेले निर्णय अचूक ठरतील. आर्थिक प्रगती होईल. नोकरीत वरिष्ठ महत्त्वाच्या कामासाठी तुमची निवड करतील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. नवीन ओळखी होतील. मिळालेल्या संधीचा फायदा घ्या. महिलांचा नको त्या कामात वेळ जाईल.
वृश्चिक : नवीन विचार फायदेशीर
व्यवसाय वृद्धिंगत होण्यास अनुकूल काळ आहे. कामात बदल करून फायदा मिळवण्याकडे कल राहील. नवीन घडामोडी व नवीन विचार फायदेशीर ठरतील. नोकरीत मनातील सुप्त इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. सहकारी कामात मदत करतील. वरिष्ठांच्या मर्जीत राहाल. जादा कामातून पैसे मिळतील. महिलांनी आवडत्या छंदात मन रमवावे.
धनु : परदेशगमनास चांगला काळ
“प्रयत्नांती परमेश्वर’ हा तुमचा बाणा असेल. व्यवसायात नवीन उत्पन्नाचे साधन मिळाल्याने आनंद वाटेल. पूर्वी केलेल्या कामातून आता फायदा मिळेल. कामात कार्यतत्पर राहिल्यास फायदा होईल. नोकरीत तुमच्या अंगी असलेल्या कलागुणांना दाखवण्याची संधी मिळेल. नवीन हितसंबंध जोडले जातील. उच्च शिक्षणासाठी परदेशगमनास चांगला काळ. महिलांनी हट्टी स्वभावावर नियंत्रण ठेवावे.
मकर : जोडधंद्यातून फायदा
मनाची झालेली द्विधा मनःस्थिती बरीचशी कमी होईल. व्यवसायात व शेअर्समधून फायदा होईल. नवीन कामे मिळतील. नवीन आशावाद जागृत होईल. चांगली बातमी कळेल. नोकरीत महत्त्वाची कामे हातावेगळी करा. वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करा. नवीन महत्त्वाची जबाबदारी स्वीकारावी लागेल. जोडधंद्यातून फायदा होईल. महिलांनी अतिहव्यासापोटी जादाची कामे स्वीकारू नयेत. दगदग, धावपळ कमी करावी.
कुंभ : नोकरीची संधी
ग्रहमान हळूहळू सुधारत आहे. त्यामुळे कामाचा उत्साह दिवसेंदिवस वाढेल. व्यवसायात आर्थिक स्थिती चांगली राहील. अनपेक्षित कामे होतील. कामात विस्तार करण्याचे बेत सफल होतील. नोकरीत कमी श्रमात जास्त यश संपादन करू शकाल. बेकारांना नवीन नोकरीची संधी. कलाकार, खेळाडूंना मानमरातब मिळेल. महिलांची अध्यात्मात प्रगती होईल. प्रियजनांच्या सहवासात वेळ चांगला जाईल.
मीन : पूरक ग्रहमान
तुमच्या रसिक व कल्पक स्वभावाला पूरक ग्रहमान लाभल्याने जीवनाचा आनंद पुरेपूर लुटाल. व्यवसायात कामातील अडथळे दूर झाल्याने कामांना गती येईल. हितचिंतकांच्या मदतीने खेळत्या भांडवलाची गरज भागेल. नवीन कामे दृष्टिक्षेपात असतील. नोकरदार व्यक्तींना मनाप्रमाणे कामे केल्याने आनंद मिळेल. कामाच्या वेळी काम व इतर वेळी आराम मिळेल. वरिष्ठ एखादी सवलतही देतील.